मुंबई जवळील गोरेगाव या खेड्यातील मुलांना शिक्षणाची सोय गावातच उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने
1940 साली संस्थेची स्थापना झाली. केवळ चार मुले व तीन मुलींना बरोबर घेऊन अंबाबाई देवस्थानच्या
आवारात इयत्ता पाचवी म्हणजे तेव्हांच्या इंग्लिश पहिली पासून शाळा सुरू झाली. 1940 साली आद्यगुरुजी
गोविंद पातकर यांनी लावलेल्या रोपट्याचा विस्तार आज एका मोठ्या वटवृक्षात झाला आहे.
संस्थेतर्फे डोसीबाई जीजीभॉय बालविहार (बालवाडी), डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा (१ली ते ४थी) आणि
अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल (५वी ते १०वी), या मराठी माध्यमाच्या तीन शाळा चालवल्या जातात.
तसेच संस्थेची कमला मफतलाल मेहता संगणक केंद्र, अ. भि. गोरेगावकर क्रीडा अकादमी
आणि प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयास ('प्रयास'), अशी तीन केंद्रे कार्यरत आहेत.
मंडळ पुढील उद्दिष्ठांसाठी ‘प्रयास’ मार्फत सतत प्रयत्न करत असते.