मुलांसाठी - लाल पांढऱ्या चौकटीचे शर्ट व लाल हाफ पॅंट
मुलींसाठी - लाल पांढऱ्या चौकटीचा फ्रॉक
शाळेच्या येण्याजाण्याच्या वेळा पाळणे आवश्यक आहे. शाळा सुटल्यानंतर मुलाची जबाबदारी पू्र्णतः पालकांची राहील.
कोणत्याही कारणास्तव मूल गैरहजर राहिल्यास पालकांनी शाळेला लेखी कळवावे. आजारपणामुळे चार दिवसांपेक्षा जास्त दिवस मूल गैरहजर असेल तर लेखी अर्जासोबत डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
आजारपणाव्यतिरिक्त इतर कारणाने शाळेत हजर राहता येणार नसेल तर आगाऊ लेखी अर्ज करावा लागेल.
प्रत्येक महिन्याच्या 10 ते 20 तारखेदरम्यान शैक्षणिक शुल्क भरावे लागेल.
पालक सभा, कार्यशाळा यांना पालकांची उपस्थिती आवश्यक राहिल.
पालक वाचनालयाचा लाभ पालकांनी घ्यावा.
मुलांच्या विकासाविषयी शाळेचा विचार आणि भूमिका समजून घेऊन शाळेला सहकार्य करावे.
जून २०१५ पासून दोन गटांमध्ये चालणारी बालवाडी छोटा शिशुगट, मोठा शिशुगट आणि बालगट अशा तीन गटांमध्ये सुरु झाली.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेशासाठी बालकाचे वय ३१ डिसेंबर २०२१ रोजी ३ वर्ष पूर्ण झालेलें असावे.
सोमवार ते शुक्रवार - सकाळी 9:00 ते 12:00 आणि शनिवार, रविवार सुट्टी
सोमवार ते शुक्रवार - दुपारी 12:30 ते 5:30 आणि शनिवार - सकाळी 10:30 ते 3:30